Latest Marathi News Updates

हॉटेल वाल्यांच्या घरगुती भांडणामुळे, गिऱ्हाईकाची ८ वर्षाची मुलगी तेलात होरपळली, जाणून घ्या सविस्तर माहिती 

हॉटेल वाल्यांच्या घरगुती भांडणामुळे, गिऱ्हाईकाची  ८ वर्षाची मुलगी तेलात होरपळली, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कसाईवाडा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गरम तेलात पडून आठ वर्षांची मुलगी जळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाला विकणाऱ्या दोन दुकानदारांमध्ये झालेल्या भांडणातून ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी वसीम खलील अन्सारी आणि मुस्तकीम हकीम अन्सारी या दोन आरोपींना अटक केली आहे.

अन्सारी कसाईवाडा परिसरात फूड स्टॉल चालवतात. दोन दिवसांपूर्वी, जेव्हा 8 वर्षीय अफसीन शेख आणि 76 वर्षीय मुनव्वर अली पुरी-भाजी घेण्यासाठी एका स्टॉलसमोर थांबले होते, तेव्हा अन्सारी अचानक काही घरगुती कारणावरून भांडू लागले. त्यातील एकाचा कढईला धक्का लागला. आणि गरम तेल अफसिन आणि अली यांच्या अंगावर पडले.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे, तर अलीला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमी मुलीवर दवाखान्यात उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजले आहे. मात्र तिला किती गंभीर दुखापत झाली याची पूर्ण माहिती अद्याप मिळाली नाही. दुसयांच्या भांडणात कोवळ्या मुलीला फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply