Latest Marathi News Updates

मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन ११०० एमएम मुख्य जलवाहिनी बाभळगावजवळ लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे तीन दिवस पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दुरुस्ती काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे मंगळवारी गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर या भागास पाणीपुरवठा झाला नाही.

या भागात बुधवारी (१६ मार्च ) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, माणिक चौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड या भागात गुरूवारी पाणी सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply