Latest Marathi News Updates

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, उसाने भरलेल्या ट्रेलरला कारची धडक, तीन मित्रांचा मृत्यू

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, उसाने भरलेल्या ट्रेलरला कारची धडक, तीन मित्रांचा मृत्यू

अहमदनगर: अहमदनगरमध्ये कारच्या भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री पहाटे एक वाजता हा अपघात झाला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाजवळील हॉटेल अनन्यासमोर हा अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रेलरच्या मागून कार आदळल्याने हा अपघात झाल असल्याचे समोर आले आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की कारमध्ये असलेल्या तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला असून,  राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस अशी मृतांची नावे आहेत. राहुल आणि आकाश त्यांचा मित्र केशव सायकरला त्याच्या गावी सोडण्यासाठी निघाले होते.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंटचा असून रुंद आहे. त्यामुळे येथे वाहने वेगाने धावतात. दरम्यान, साखर कारखान्यांचा ऊस खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील भागात रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दोघांचा जागीच मृत्यू 

कार-ट्रेलरच्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्या मित्राचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला यावरून अपघाताचे गांभीर्य लक्षात येते. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक गावकऱ्यांशिवाय हॉटेलमध्ये उपस्थित असलेले अनेक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवण्यात यश आले नाही.  तीन मित्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply