Latest Marathi News Updates

अहमदनगरमधील जिप गट आणि पंचायत समितीचे गण वाढले ! आता प्रत्येक तालुक्यात…

अहमदनगर : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांची मार्च महिना अखेरीला मुदत संपत आहे. नवीन आदेशानुसार लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील गट व गणांची संख्या वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण झाले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला नवीन आदेशानुसार गट व गणांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कच्चा आराखडा तयार केला आहे.

कच्च्या आराखड्यानुसार पाथर्डी व अकोले तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्‍यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गणांचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषद गटांचा कच्चा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणरचनेचा कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करणार आहेत.

नवीन गट आणि गणांची रचना करण्यासाठी सध्याचे गट आणि गणांची मोडतोड होणार आहे. राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक ८५ गट व १४ पंचायत समित्यांसाठी १७० गण निश्‍चित करण्यात आले आहेत. राज्यात अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गण सर्वाधिक राहणार आहेत.

फेब्रुवारी २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे ७३ गट, तर १४६ गण होते. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे.

Leave a Reply