Latest Marathi News Updates

‘या’ भाजीत आहे चिकन-मटण पेक्षा जास्त पोषक तत्व, जाणून घ्या ‘या’ भाजीचे फायदे

आरोग्य: जेव्हा पौष्टिकतेचा विचार केला जातो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला फळे, चिकन, मटण इ. पदार्थांची आठवण येते. तसेच चांगल्या आहारात हिरव्या भाज्यांनाही महत्त्व दिले जाते. पण जर तुम्हाला अशा भाजीबद्दल माहिती नसेल जिच्यात मांसाहारापेक्षा जास्त पौष्टिक तत्व आहेत. ह्या हिरव्या भाजीमध्ये भरपूर पोषक तर असतातच पण त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीही जास्त असते. ही भाजी अनेक आजारांपासून संरक्षण करते. या भाजीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही भाजी खूप लवकर आपला प्रभाव दाखवते. तर जाणून घेऊया या भाजीविषयी संपूर्ण माहिती.

कर्टुले/ कंटोला किंवा गोड कारला :
या हिरव्या भाज्याला कर्टुले किंवा गोड कारला असेही म्हणतात. आयुर्वेदात या भाजीला सर्वात महत्वाची आणि ताकदवं भाजी म्हटले आहे. जर तुम्हीया भाजीचा नियमित आहारात समावेश केला तर तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी राहील. ही भाजी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यातील फायटोकेमिकल्स आरोग्यदायी असतात. यासोबतच अँटीऑक्सिडंट रक्त शुद्ध करते. त्यामुळे त्वचेच्या आजारांसह अनेक आजार टाळता येतात.

नॉनव्हेजपेक्षा 50 पट जास्त फायदेशीर :

नॉनव्हेज हे प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की करटुल्यात चिकन-मटण, अगदी अंड्यांपेक्षाही जास्त प्रोटीन असते. हे भाजी जड कसरत करणार्‍यांसाठी सर्वात फायदेशीर आहे. म्हणजे खेळाडू, अवजड काम करणारे व्यक्तीसाठी ही भाजी उपयुक्त आहे.

भरपूर प्रथिने आणि लोह असलेले हे कमी कॅलरी अन्न आहे. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनीही करटुल्याची भाजी खावी. . या भाजीचे सर्व गुणधर्म लक्षात घेऊन त्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. ही भाजी सहसा हिवाळ्याच्या सुरुवातीला मिळते. परंतु वर्षाच्या इतर महिन्यांत सुद्धा  सामान्य प्रमाणात आढळते.

Leave a Reply