Latest Marathi News Updates

नगर शहराचे सुपुत्र रोहित जोशी यांची कौतुकास्पद कामगिरी

हैद्राबाद येथे शासनाच्या कस्टम खात्यात डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रोहीत प्रकाश जोशी यांच्या नेतृत्वाखाली CGST रंगारेड्डी आयुक्तालयाच्या preventive शाखेने मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लिमिटेड, हैदराबाद,यांच्याविरुद्ध तपास सुरू केला

नगर शहराचे सुपुत्र रोहित जोशी यांची कौतुकास्पद कामगिरी

नगर शहराचे सुपुत्र व सध्या हैद्राबाद येथे शासनाच्या कस्टम खात्यात डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रोहीत प्रकाश जोशी यांच्या नेतृत्वाखाली CGST रंगारेड्डी आयुक्तालयाच्या preventive शाखेने मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लिमिटेड, हैदराबाद,यांच्याविरुद्ध तपास सुरू केला

 

व यात त्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) कथित लाभ आणि वापर केल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवलेला आहे.
देशभरातील विविध जीएसटी आयुक्तालयांमार्फत मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स च्या पुरवठादारांची चौकशी सुरू आहे. दरम्यान तपासात उघड झाले आहे की, सुमारे 13 अशा
पुरवठादार कंपन्या आहेत ज्या प्रत्यक्षात
अस्तित्वात नाहीत व त्यांनी पुरवठा न करता बनावट पावत्या पुरविल्या आहेत. मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स यांनी बनावट पावत्या च्या बळावर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आहे आणि हे क्रेडिट विविध कंपन्यांना बोगस पावत्याच्या मदतीने पुढे पाठवले आहे.
आजपर्यंत या प्रकरणातील एकूण बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रु.5.06 कोटी आहे जो सीजीएसटी कायद्याच्या कलम 132 च्या तरतुदी अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. कंपनीचे संचालक श्री संजय कुमार अग्रवाल यांनी कबूल केले आहे की, त्यांनी
वास्तविक वस्तूंचा पुरवठा न करता केवळ कमिशन मिळवण्यासाठी इनव्हॉइसमध्ये व्यवहार केला होता.
त्यानुसार कंपनीचे संचालक श्री संजय कुमार अग्रवाल यांना 22/12/2021 रोजी अटक करण्यात आली आणि
सन्माननीय आर्थिक गुन्हे न्यायालय,नामपल्ली, हैदराबाद यांच्या
समोर हजर केले.न्यायालयाने आरोपीला 14 दिवस
न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास
चालू आहे.
अशा फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
अशा फसवणूक करणाऱ्यांवर जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असे उपायुक्त श्री रोहीत जोशी यांनी सांगितले.
या कारवाईचे वृत्त भिंगारमध्ये येताच जोशी कुटूंबियांसह रोहितच्या वर्गमित्रांनी आनंद व्यक्त करत रोहितशी संपर्क साधून अभिनंदन केले.
श्री. रोहित जोशी यांनी याअगोदर राजीव गांधी एअरपोर्ट येथे ३.९६ करोड व ९८ लाख रुपये किंमतीचे परदेशी चलन तसेच ६.५ किलो सोने जप्त करण्याची कारवाई केली होती. श्री. रोहित जोशी यांनी कस्टम खात्यात रूजू झाल्यापासून निस्सीम देशभक्तीच्या भावनेतून असंख्य धडाकेबाज कारवाया केलेल्या असल्याने हैद्राबाद शहरामध्ये त्यांची एक दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
श्री. रोहित जोशी हे मूळचे भिंगार येथील नागरदेवळे भागातील रहिवासी आहेत. इयत्ता दहावीपर्यंतचे त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूलमध्ये झालेले आहे. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण नगरमधील रेसिडेन्सीयल जुनियर कॉलेज येथे झालेले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केले.

Leave a Reply