Latest Marathi News Updates

राहत्या घरात चाळीस वर्षीय माजी नगराध्यक्षा आढळल्या मृतावस्थेत… अहमदनगर मधे एकच खळबळ….

स्वतःच्याच राहत्या घरात माजी नगराध्यक्षा ह्या मृतावस्थेत आढळून आल्यामुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्वतःच्याच राहत्या घरात माजी नगराध्यक्षा ह्या मृतावस्थेत आढळून आल्यामुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच बरोबर त्यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळली असल्याच्या अवस्थेत त्यांचा मृतदेह हा सापडला आहे. मृत झालेल्या 40 वर्षीय महिला ह्या अहमदनगरमधील श्रीगोंदा या शहरात राहत होत्या.

साडी गळ्याभोवती गुंडाळल्या असल्याच्या अवस्थेत…
श्यामला मनोज ताडे ह्या अहमदनगर मधे असलेल्या श्रीगोंदा या शहराच्या माजी नगराध्यक्षा राहिल्या होत्या. आणि त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांचा मृतदेह हा साडी त्यांच्या गळ्या भोवती गुंडाळलेल्या अवस्थेत आणि विशेष फॅनला लटकलेला असा आढळून आला आहे.

श्यामला ताडे ह्या कोण होत्या?
श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये 40 वर्षाच्या असणाऱ्या श्यामला ताडे या अडीच वर्ष नगराध्यक्ष या पदावर कार्यरत होत्या. त्या आरक्षित जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातून त्या निवडून सुद्धा आल्या होत्या.

सादर घटित घटना ही धनश्री अपार्टमेंटमधील जे की अहमदनगरमधील श्रीगोंदा या शहरात आहे, तिथे त्यांच्या राहत्या घरात घडली असल्याचे समजत आहे. त्याच बरोबर या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्या मधे अकस्मिक मृत्यू झाल्याची देखील नोंद आता करण्यात आली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घडलेल्या घटनास्थळी भेट दिली आहे. आणि आता पुढील तपास चालू असल्याचे समजून येत आहे. असे असले तरी देखील माजी नगराध्यक्षांच्या अशा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply